Skip to main content

Posts

Showing posts from 2019

जीव गेला तरी

जीव गेला तरी
प्राण देऊ नये 
आणि प्राणांसवें ..... मिलनाशा 

गळे पान पान 
जरी तुटे देठ 
परंतु ती भेट..... न टळावी 

ऐसें जी घडावें 
एकदा मीलन 
मिठीमध्यें प्राण ..... मावळेल 

तेव्हा प्राणासवें 
जा घेऊनी खूळ 
ना तरी हा छळ ..... संपे कैवा 

 : शिरीष पै

मिली हवाओं में उड़नें की वो सज़ा यारो

मिलीहवाओंमेंउड़नेंकीवोसज़ायारो
किमैंज़मीनकेरिश्तोंसेकटगयायारो वोबे-ख़यालमुसाफ़िरमैंरास्तायारो
कहाँथाबसमेंमेरेउसकोरोकनायारो मिरेक़लमपेज़मानेकीगर्दऐसीथी
किअपनेबारेमेंकुछभीनलिखसकायारो तमामशहरहीजिसकीतलाशमेंगुमथा
मैंउसकेघरकापताकिससेपूछतायारो जोबे-शुमारदिलोंकीनज़र

मायबापा : प्रपंच

माणूस होऊन जगणे थोडे जगुन पहा 
देवपणा तू सोडून खाली उतर जरा .... मायबापा मायबापा 

तू नसल्याचा भास पसरला चहूंकडे 
दगड मातीच्या भिंतीमधुनी विहर जरा ..... मायबापा मायबापा 

या जगण्यातून काढून घे हे जेहर जरा 
उलट जरासा दुःखाचा हा प्रहर जरा ..... मायबापा मायबापा 

रडता रडता या ओठांवर कधी तरी 
हसण्याचाही थोडासा कर कहर जरा .... मायबापा मायबापा 

सुखदुःखाचे झाले आता गाव जुने 
या हसण्या रडण्यामधुनी तू बहर जरा ..... मायबापा मायबापा 

अंगण होईल देव्हाऱ्यासम पावन हे 
वेलीवरल्या पानफुलांतून डवर जरा ..... मायबापा मायबापा 

तेवत राहो माणुसकीचा एक दिवा 
आठवणीतून माणूस होवो अमर जरा ..... मायबापा  मायबापा 

आयबापाची लाराची लेक मी लारी

मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजाघर पान्यावरी, बंदराला करतो ये जा..वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा..आयबापाची लाराची लेक मी लारीचोली पिवली गो, नेसलंय अंजिरी सारीमाज्या केसान गो मालीला फुलैला चाफावास परमाळता वार्‍यान घेतय झोकानथ नाकांन साजिरवानीगला भरुन सोन्याचे मनीकोलीवार्‍याची मी गो रानीरात पुनवेला, नाचून करतय मौजाया गो, दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठाकवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटाकवा उदानवारा शिराला येतय फारुकवा पान्यासुनी आभाला भिरतंय तारुवाट बगून झुरते पिरतीमंग दर्याला येतंय भरतीजाते पान्यानं भिजून धरातीयेतंय भेटाया तसाच भरतार माजाभल्या सकालला आबाल झुकतं हे खालीसोनं चमचमतंय दर्याला चढते लालीआमी पान्यामंदी रापण टाकतो जालीधन दर्याचं लुटून भरातो डालीरात पुनवेचं चांदन प्यालीकशी चांदीची मासोली झालीमाज्या जाल्यात होऊन आलीनेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा

: शांता शेळके

तुझे वाढलेले हट्ट

तुझे वाढलेले हट्ट ... तुझ्या वाढलेल्या खोड्या ..... 
खऱ्या मानुनी सोडल्या ..... तुझ्या कागदाच्या होड्या .... 
कागदाच्या होडीचेही शीड सांभाळले बाळा.... 

: संदीप खरे

उजेडी राहिले उजेड होऊन

इंद्रायणी काठी देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची ।।धृ.।। ज्ञानियाचा राजा भोगतो राणीव
नाचती वैष्णव मागे पुढे ।।1।। मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगात झाड कैवल्याचे ।।2।। उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती सोपान मुक्ताबाई ।।3।।
ग. दि. मा .

अवेळीच केव्हा दाटला अंधार

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले, काळे सर एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले
हासताना नभ कलून गेलेले पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
तिच्या डोळियांत जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले : ना. धो. महानोर

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहेअजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहेउगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाहीगडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहेसख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचेउभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !

: सुरेश भट

जरी तुझीया सामर्थ्याने

जरी तुझीया सामर्थ्याने ढळतील दीशाही दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दीपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन स्वत:ला वीसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारे

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे?

येशील का संग पहाटे
किरणाच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती
हळू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
दवबिंदू होउनी ये तू
कधी भीजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे