Thursday, December 19, 2019

जीव गेला तरी

जीव गेला तरी
प्राण देऊ नये 
आणि प्राणांसवें ..... मिलनाशा 

गळे पान पान 
जरी तुटे देठ 
परंतु ती भेट..... न टळावी 

ऐसें जी घडावें 
एकदा मीलन 
मिठीमध्यें प्राण ..... मावळेल 

तेव्हा प्राणासवें 
जा घेऊनी खूळ 
ना तरी हा छळ ..... संपे कैवा 

 : शिरीष पै 

No comments:

Post a Comment