Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

तुझे वाढलेले हट्ट

तुझे वाढलेले हट्ट ... तुझ्या वाढलेल्या खोड्या ..... 
खऱ्या मानुनी सोडल्या ..... तुझ्या कागदाच्या होड्या .... 
कागदाच्या होडीचेही शीड सांभाळले बाळा.... 

: संदीप खरे

उजेडी राहिले उजेड होऊन

इंद्रायणी काठी देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची ।।धृ.।। ज्ञानियाचा राजा भोगतो राणीव
नाचती वैष्णव मागे पुढे ।।1।। मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगात झाड कैवल्याचे ।।2।। उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती सोपान मुक्ताबाई ।।3।।
ग. दि. मा .

अवेळीच केव्हा दाटला अंधार

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले, काळे सर एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले
हासताना नभ कलून गेलेले पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
तिच्या डोळियांत जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले : ना. धो. महानोर

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहेअजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहेउगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाहीगडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहेसख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचेउभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !

: सुरेश भट