Tuesday, February 20, 2018

जीव गुंतलाकोवळ्या उन्हात जीव गुंतला
मोकळ्या क्षणात जीव गुंतला
सुख आले भरभरून, गेलेही
राहिल्या खुणांत जीव गुंतला
बोलले न प्रेम, फक्त सोसले
त्या खुळ्या मनात जीव गुंतला
दीप लाविला उरी कधी कुणी
आजही ॠणात जीव गुंतला
कळे निरोप घ्यायचा, नि घेतला
तरिही जीवनात जीव गुंतला
अरुणा ढेरे

No comments:

Post a Comment