Sunday, February 11, 2018

तळ्यांत

कसा कुणी एकाएकी 
खडा फेकला तळ्यांत ;
उमटल्या वलयांनी 
वेडा केला उभा काठ . 

झाली उलटीसुलटी 
तळ्यातली क्षणात ;
चुरा कोरीव लेण्याचा 
विरे काठाच्या मातींत . 

ओसरता एक क्षण 
पुन्हा सारे थिरावेल 
आणि सावध काठाशी 
लाट उगा उमळेल . 

: तळ्यांत 
: मेंदी 
: इंदिरा संत 


No comments:

Post a Comment