Saturday, June 13, 2020

झाडझाडाला आले फुल,
झाडालाच पडली भूल, 
फुलाला आले फळ,
फुलाला पडली भुरळ,
फळावर आले रंग ,
ते त्यांच्यातच दंग,
फळ पडलें तुटून,
झाड गेले वठून. 

: झाड 
: नक्षत्रांचे देणें 
: आरती प्रभू No comments:

Post a Comment