Saturday, June 13, 2020

सर

भुईवर आली सर 
सर श्रावणाची 
भुईतून आली सर 
रुजव वाळ्याची 

भुईवर आली खार 
खार धिटाईची ,
भुईतून कणसात 
चव मिठाईची. 

भुईवर आली उन्हें 
उन्हें पावसाची 
पायीं तुझ्यामाझ्या भुई 
चिकणमातीची !

: सर 
: नक्षत्रांचे देणे 
: आरती प्रभू No comments:

Post a Comment