Thursday, May 2, 2019

असे शब्द, असे अर्थ

असे शब्द , असे अर्थ .... 
   मेघ उदार वाहती, 
माझ्या धूळ -पाचोळ्याला 
   कस्तुरीचे दान देती. 

अशा शब्दांचे चंदन 
   कशी भाळावरी लावू ?
चकमकीचे मी फूल 
   अशी चांदणीशी होऊं ?

असे शब्द, असे अर्थ .... 
  निळे आकाश मंथर,
माझ्या दीपकळीसाठी 
   व्हावें शेल्याचे पाखर . 

: असे शब्द, असे अर्थ 
: चित्कळा 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment