Friday, August 10, 2018

आईच्या दुःखाचं

आईच्या दुःखाचं 
डोळाभर पाणी 
दाटली कहाणी 
आयुष्याची 

शेवटी मनींचे 
सांगणे राहिले 
हुंदक्यांनी मुके 
पंचप्राण 

गलबला सोसले 
सोडतांना घर 
माझे महाद्वार 
ओस झालें 

आमुच्या संसारी 
घोटाळों न मन 
तिथे तरी प्राण 
शांत राहों 

जात्याच्या ओवीचा 
संपला वेदांत 
देव्हाऱ्यात  वाट 
करपली. 

: पानझड 
: ना. धों . महानोर. 

No comments:

Post a Comment