Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

डोळाबंद

आली अमृताची आठवण  आली तुझी आठवण:  साठवाया रक्तामध्यें  डोळे घेतले मिटून ; 
उभी अस्वस्थशी रात्र  गळ लावून चंद्राचा : हरवले काही त्याचा  शोध घेतसे केव्हाचा; 
फुलांतून मेघांतून  धुळींतून वाहे वारा :  हरवले कांही त्याचा  शोध घेतसे सैरावैरा; 
हरवले त्यांचे कांही  काही घनदाट धुंद :  कसे सापडे त्यांना  केव्हाच ते डोळाबंद !
: डोळाबंद  : रंगबावरी  : इंदिरा संत