Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

Pu. L.

शेवटीसंस्कृतीम्हणजेबाजरीचीभाकरी ... वांग्याचेभरीत ...गणपतीबाप्पामोरयाचीमुक्तआरोळी. केळीच्यापानातलीभाताचीमूदआणित्यावरचेवरण. उघड्यापायांनीतुडवलेलापंचगंगेचाकाठ... मारुतीच्यादेवळातएकादमातफोडलेल्यानारळातलेउडालेलेपाणी... दुस-याचापायचुकूनलागल्यावरदेखीलआपणप्रथमकेलेलानमस्कार......दिव्यादिव्यादिपत्कार... आजीनेसांगितलेल्याभुताच्यागोष्टी... मारुतीचीनजळणारीआणिवाटेलतेंव्हालहानमोठीहोणारीशेपटी... दस-यालावाटायचीआपट्याचीपाने... पंढरपुरचेधुळआणिअबीरयांच्यासमप्रमाणातमिसळूनखाल्लेलेडाळे

तरीही वसंत फुलतो

प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
उमले फुले इथे जे, ते ते अखेर वठते
लावण्य, रंग, रूप, सारे झडून जाते
तो गंध, तो फुलोरा, अंती धुळीस मिळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
जे वाटती अतूट, जाती तुटून नाते
आधार जो धरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो.......................!!
तरीही फिरून बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरून श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरून अंत, उगमाकडेच वळतो.......
उगमाकडेच वळतो..........................!!
प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो.......................!
:सुधीर मोघेध्यास

चांदण्यांचा झोत       झरे नभातून 
माझ्या मनातून       ध्यास तुझा. 

निर्झराचा नाद       घुमे पहाडांत 
माझ्या अन्तरात       हाक तुला. 

जुन्या देवालयात       उजळते वात 
माझ्या जिवनात       प्रीति तुझी. 

निळ्या आभाळात       पाखरांचे थवे 
वेडी माया धावे      तुझ्याकडे. 

निशी स्मशानांत       रात्रींचर रडे 
उरी धडधडे       तुझ्यासाठी. 

: ध्यास 
: विशाखा 
: कुसुमाग्रज

तरीही केधवा

दोघांत आजला 
अफाट अंतर 
जुळून पाकळ्या 
उडाल्या नंतर -

जीवनावाचून 
जळला अंकुर 
प्रश्नही राहिला 
राहिले उत्तर !

संग्राम आजला 
शोधतो जीवित 
उरीचे ओघळ 
दाबून उरात -

उठती भोवती 
धुळीचे पर्वत 
अखंड फिरते 
वरून कर्वत !

वादळी रणात 
करणे कोठून 
नाजूक भावांचे 
लालनपालन 

तरीही केधवा 
पडता पथारी 
थडगी दुभंग 
होतात अंतरी -

आठवे तुझ्या ते 
प्रीतीचे मोहळ 
आणि हो बिछाना
आगीचा ओहळ !

: तरीही केधवा 
: विशाखा 
: कुसुमाग्रज