Tuesday, February 25, 2020

माझी फुलवेडी वेलमाझी फुलवेडी वेल

तिची फुलांची लहर
नेमावाचून बहर
तिची फुलण्याची खुशी
जेव्हा लागतसे कळ
पानापानामागे फूल
असा प्राणाचा बहर
रोज येईल कुठून
देठ जाईल तुटून
देठ तुठतांना तरी
डोळे यावेत भरून
वेड वेलीचे स्मरून


 शिरीष पै 

Friday, February 14, 2020

अवेळीच केव्हा दाटला अंधार

अवेळीच केव्हा दाटला अंधार
 तिला गळा जड झाले, काळे सर

 एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले
 हासताना नभ कलून गेलेले

 पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
 तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
 आणि माझा मला पडला विसर 
मिठीत थरके भरातील ज्वार 

 कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
 तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
 तिच्या डोळियांत जरा मी पाहिले
 काजळात चंद्र बुडून गेलेले 
 : ना धों महानोर