Tuesday, September 3, 2019

आयबापाची लाराची लेक मी लारी

मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा घर पान्यावरी, बंदराला करतो ये जा ..वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा.. आयबापाची लाराची लेक मी लारी चोली पिवली गो, नेसलंय अंजिरी सारी माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा वास परमाळता वार्‍यान घेतय झोका नथ नाकांन साजिरवानी गला भरुन सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गो रानी रात पुनवेला, नाचून करतय मौजा या गो, दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठा कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटा कवा उदानवारा शिराला येतय फारु कवा पान्यासुनी आभाला भिरतंय तारु वाट बगून झुरते पिरती मंग दर्याला येतंय भरती जाते पान्यानं भिजून धराती येतंय भेटाया तसाच भरतार माजा भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली आमी पान्यामंदी रापण टाकतो जाली धन दर्याचं लुटून भरातो डाली रात पुनवेचं चांदन प्याली कशी चांदीची मासोली झाली माज्या जाल्यात होऊन आली नेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा

: शांता शेळके