Saturday, November 10, 2018

तमाची तमा बाळगू मी कशाला

तमाची तमा बाळगू मी कशाला 
इथे जागली स्पंदनाची धुनी 
तुझे नाव घेता विरे शीण सारा 
दिव्यांची जणू रोषणाई मनी 

तुझ्या आठवाने उटी चंदनाची 
जणू आसमंतात गंधाळते 
मिळे शांततेला नवा सूर आणि 
फुलें गर्द एकांत रानीवनी . 

: मिलिंद जोशी