Tuesday, January 2, 2018

पायाखाली वाळू

पायाखाली वाळू 
जाता तुडवित 
ढासळले चित्त 
कणकण 

ओहोटीच्या पार 
लावता मी ध्यान 
अचानक ऊन 
मावळले 

अशी भडकावी 
काळजात आग 
तैसा रंग राग 
चोहीकडे 

अपुऱ्या डोळ्यात 
न मावे सोहळा 
पाहिजे फाटला 
उर आतां. 

: पायाखाली वाळू 
: शिरीष पै 

No comments:

Post a Comment