Wednesday, December 27, 2017

झुडूप

काळोखाच्या उताराशी 
वाहणारा गूढ झरा 
पण पडतां दचके 
सश्यासारखा बुजरा 

दाट भित्र्या पानांची 
गुंग ओलसर हवा 
मधूनच तीढी फांदी 
गुणगुणते काजवा 

डबक्याच्या कपाळाशी 
थंड बेढब झूडूप 
पडे  बेडूक होऊन 
डोळे मिटून गुडूप 

: झुडूप 
: उत्सव 
: मंगेश पाडगावकर 

No comments:

Post a Comment