Wednesday, December 27, 2017

फुलें

उशालगतची 
ती आजारी ... फिकट फुलें 
उघड्या डोळ्यांचे 
ते खिन्न मिटलेपण 
त्या डोळ्यांतील वाटेवर 
मिणमिणत्या अंधारी 
तू मला दिलेले 
कधी न संपणारे 
एकाकीपण 

बाहेर देवळापाशी 
खिन्न दुमडल्या ओठाचे 
ते ऊनही  सरतीचे 
उशालगतच्या 
आजारी ..... फिकट फुलांच्या रंगाचे ..... 

: फुलें 
: उत्सव 
: मंगेश पाडगावकर 

No comments:

Post a Comment