Friday, December 29, 2017

एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई

एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई
कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई
एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई...

अगदीच हळूवार नको राजरोष
पाकळीचं एक नको डवरले घोस
पानासाठी कवितेच्या देना खुण काही
एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई....

क्षण एक थांब अशी हवीशी होऊन
एकदाच मनी तुला घेतो चितारून!
आणि तुझ्या मौनाचीच चित्रावर सही
एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई.....
कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई?

:संदीप खरे


No comments:

Post a Comment