Wednesday, December 27, 2017

प्रथमच माझे शब्द पाहिले

चंद्र उमलत्या सरल्या रात्री 
थंड धुके हे आले 
निळे कवडसे 
शिडे  मालवून 
डोळ्यांआड बुडाले 


पंख तुटुनिया शीळ  बावरी 
ओठांवरती पडली 
दुखावल्या चोचीतली गाणीं 
अर्ध्यावरती अडली 

किती वेळ हा उभा एकटा 
अंधारात इथे मी :
प्रथमच माझे 
शब्द पाहिले 
एकांतात रिते मी 

: प्रथमच माझे शब्द पाहिले 
: उत्सव 
: मंगेश पाडगावकर 

No comments:

Post a Comment