Monday, October 30, 2017

एकजणे

मौनाचा तो रंग । तुझे डोळेपण 
काजळा ग देणं । लागे ज्योती 

दिस विसाविता ।मनचि पांगले 
मोगरीचे कळे  । ठायीं  ठायीं 

साद न ये घालू । उरीच्याही लयी 
नाद वाहों  जाई  । चहोकडे 

पुष्पशेजेपरी । आगीचं अंथरू 
मी - तू पण करूं । पांघरूण 

होतील ग अंगें । राख एके ठायीं 
तुझीमाझी येई । वेगळू  का ?

ऐशा वसतीची  । आम्ही एकजणे 
पाठमोरें होणें । डोळापणी 

: एकजणे 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment