Tuesday, October 31, 2017

हसूनीच विसरावें.

कष्ट घेत अंगावर 
    हसूनही हासवावें 
आणि उगाच उथळ 
    बोलूनही बोलवावे 

- कसे तुही म्हणावे त्या 
    किती धीराचे जीवन 

समाधीचं जीवनाची , 
    वर तगर ढळते;
विसाव्यास गवळण 
    उर फुटे तो भांडते . 

उगाच का असे काही 
    तुला तरी कळवावे 
तुझे अजाण कौतुक 
    हसूनीच विसरावें. 

: हसुनीच विसरावे 
: मेंदी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment