Monday, October 30, 2017

गर्व

घरादारा गर्व 
गर्व तुळशीचा 
तुळशीला गर्व 
वाती - रांगोळीचा. 
रांगोळीला गर्व 
सवाष्ण हाथांचा ,
हाथानां अन गर्व 
मंजुळ चुड्यांचा . 
घरादारा गर्व 
केळीच्या बनाचा, 
संसाराला गर्व 
शीतलपणाचा. 
गर्व ऐसा थोर 
दिवेलागणीचा ,
ओटीवर हसे 
झोपाळा कड्यांचा 
ओशाळला राजा 
चौदा चौकड्यांचा . 

: गर्व 
: नक्षत्रांचे देणे 
: आरती प्रभू 


No comments:

Post a Comment