Tuesday, October 31, 2017

घुंगुर

टाकून अवघा तोल तुझ्यावर 
    ढगाढगांतुन चालायचे ;
कुंपणतारावरून विजेच्या 
    खुशाल पाऊल टाकायाचे . 

-तूंच लाविली ओढ अशी ही . 
    धूळ निघाली उंच उंच वर ;
जमिनीवरून सुटले पाऊल 
    गळले पायांमधले घुंगुर . 

: घुंगुर 
: मेंदी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment