Tuesday, October 31, 2017

कनवाळू

सुक्या मडकीत । पाणी ओले राही 
दाण्यांतली लाही । सुखरूप 

घटकेचे आलों । तरी घट फोडू 
ढुंगावर ओढू । नभ ओले 

कातड्याचे जोडे । तैसेच हे डोळे 
देवें  बनविलें । आम्हांमापें 

मनातले दाणे । भाजाया खापर 
त्याच्यात वापर । भिक्षेसाठी 

नाही कसा म्हणू । ईश्वर कृपाळू 
येतें  मुळूमुळू । रडू सुके 

: कनवाळू 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment