Monday, September 25, 2017

फूल
कशी कळी आली तेव्हा 
गाल फुगवून 
पुन्हा पुन्हा हवे होते 
तेच नाकारून 

कशी कळी थरथर 
पावसांत न्हाली ?
नव्हताच मुळी तेव्हा 
पाऊस आभाळी 

कशी कळी भेटीसाठी 
सैरभैर झाली ?
अचानक धीट होता 
फुलूनच आली. 

: फूल 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment