Sunday, September 10, 2017

नाही विसरता येत

 नाही विसरता येत 
रक्त - उकळीची मिठी 
पंख पंख झाली दिठी 

नाही विसरता येत 
प्राणभरतीची हाक 
भोवऱ्याची आणभाक 

नाही विसरता येत 
झेप आंधळ्या उडीची 
घडी आभाळंबुडीची 

नाही विसरता येत 
नसांची ती वाताहत 
उशीखाली तुझा हाथ 

नाही विसरता येत 
पाय ओढणारे पाप 
मीच माझा होतो शाप . 

: नाही विसरता येत 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment