Sunday, September 10, 2017

पाखरू

झाड पेटले फुलांनी : 
फुटे डहाळीला ऊन 
झुलणाऱ्या गवतात 
आले आकाश रुजून 

दोन कवडसे झाले 
पंख जादूच्या तळ्याचे :
वाटे उडेल हे पाणी 
निळ्या अभ्रकी गळ्याचे 

: पाखरू 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment