Sunday, September 10, 2017

सुकतीच्या ओठांवर

सुकतीच्या ओठांवर 
पक्षांचा शुभ्र थवा 
शब्दांविण झुरण्यापरी 
खोल निळी गूढ ...  

सुकतीच्या पापणीशी 
लाटांच्या आठवणी ... 
कलकांतून सूर तसे 
थरथरते स्वप्न मनी ... 

सुकतीच्या ओठांना 
जाणवतो शुभ्रपणा ... 
थकलेल्या मातीवर 
भरतीच्या गाढ खुणा ... 

सुकतीच्या ओठांवर 
पक्षांचा शुभ्र थवा 
क्षण उडुनी ... स्थिरत पुन्हां 
अधिक गूढ करीत हवा ... 

: सुकतीच्या ओठांवर 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment