Sunday, September 3, 2017

उत्सव

तो पहिलावहिला 
उत्सव डोळ्यांचा ... 

ती अंधाराच्या गाभाऱ्यातील 
चंद्रज्योतींची फुले ... 
ती मऊ धिटाई... लाख पाकळ्यांची ... 
ती नव्यानव्याने 
माझीच मला पटलेली 
पहिलीवहिली ओळख 
आकाशाच्या मोरपिसांखाली ... 

हलकेच पहाटेच 
पाण्यावर कुजबुजइवली 
टपटपलेली 
प्राजक्ताची फुलें ... 
त्या पाण्याचा सुगंध नाजूक 
साठवलेली ज्यांतून 
ती अबोध शिरशिर ... 

तो पहिलावहिला 
उत्सव डोळ्यांचा ... 

: उत्सव 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment