Monday, August 28, 2017

खुणा

डोळेभेटीची ओळख 
चारचौघांत विसर 
दाट पानांत लपव 
भित्री श्रावणाची सर 

फुलपंखी कुजबुज 
ठेव ओठात मिटून 
वर निबर शब्दांची 
रास ठेवावी रचून 

पापण्यांची गूढ भाषा 
अर्थ तुला मला ठावें 
वाट चुकल्यावरच 
पाखरांनी गाणे गावे 

पळसाच्या फुलांकडे 
पहा हळूच चोरून 
लपविल्या आशयाच्या 
खुणा तिथेच अजून 

: खुणा 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment