Thursday, August 31, 2017

एक चांदणी

एक चांदणी कोसळतांना 
गीत म्हणाली 
गीत म्हणाली आणि नंतर 
पत्थर झाली 

सरळ भाबडी वाट अचानक 
वनांत वळली 
वनांत वळली अन नंतर 
डोहातच बुडली 

सर्वस्वाचे दान उधळण्या 
कुणि तळमळली 
तळमळली अन मिटून डोळे 
मनांत जळली 

अजून कधीतरी पत्थरांतुनी 
कण्हते गाणे 
डोहांकाठी फिरे पाखरूं 
केविलवाणे 

: एक चांदणी 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment