Monday, August 28, 2017

बाहेर

बाहेर 
चांदण्यांच्या बावऱ्या फांदीवर 
धुक्याचे दोन पक्षी 
जुळ्या कळ्यांसारखे 
उमलले आहेत ..... 

बाहेर 
दूरच्या चांदणीच्या 
बावलेल्या पापणीवरून 
वाऱ्याचे  दवप्रसन्न ओठ 
फिरत आहेत ..... 

बाहेर 
गुलमोहराच्या झाडावरचे 
पिंजरपक्षी 
अर्धमिटल्या लाल चोचींत 
चांदण्यांचे निळे - पांढुरके थेंब 
धरून बसले आहेत ..... 

बाहेर 
विरघलेल्या सावल्यांचा 
पाखरांच्या डोळ्यासारखा 
नितळ काळा प्रवाह 
वाहतो आहे ..... 

"आहे का ?"
"..... होय ....."
"..... मग जवळ ये ...... सगळे विसरून ...."

: बाहेर 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

No comments:

Post a Comment