Sunday, August 27, 2017

पिसे

बोरी बाभळीला । नसे आठवण ।
फुलांची ठेवण । फुलांमागे ।।

करवंदी जाळी । वेळू  फुलारला ।
मृत्यू सामावला । ओंजळीत ।।

तुझ्या गावामध्ये । जळता डोंगर ।
पाण्याचा सांभाळ । कोण करी ?।।

स्मरतांना असें । साजनाचे पिसे ।
मला कोणी नसे । मागे पुढे ।।

: पिसे 
: सांजभयाच्या साजणी 
: ग्रेस 

No comments:

Post a Comment