Tuesday, August 1, 2017

अहेवपण

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी 
एखाद्या प्राणाची दिवेलागण 

सरत्या नभाच्या सूर्यास्तछाया 
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण 

एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल 
विलग पंखाचे मिटत मन 

एखाद्या प्राणाचे विजनपण 
एखाद्या फुलांचे फेडीत ऋण 

गीतांत  न्हालेल्या निर्मळ ओठा 
प्राजक्तचुंबन एखादा प्राण 

तुडुंब जन्मांचे सावळेपण
एखाद्या प्राणाची मल्हारधून 

एखाद्या प्राणाचे सनईसुर 
एखाद्या मनाचे कोवळे ऊन 

निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा 
एखाद्या सरणा अहेवपण 

: अहेवपण 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment