Tuesday, August 1, 2017

पूजा

थोडे तरी रक्त वाहो शुष्क हृदयीचे 
देठ उजळण्या मंद बकुळफुलांचे 

पाणियाची मुळी  व्हावी निळी कमळंण 
तैसा शब्द व्हावा तृषातृप्त द्रोण 

दोन हातांतील  पूजा येथेच राहून 
दोन डोळ्यांच्या  काठानें आले गेले जन्म 

व्हावी हातांची परडी खुडू यावे डोळे 
अश्रूस्नात मन व्हावे मोगरीचे कळे 

काही नाही तेथोनिया गंध कळीस्तव 
वाहतांना यावा जीवा पांघरू विस्तव 

: पूजा 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment