Thursday, August 31, 2017

एक चांदणी

एक चांदणी कोसळतांना 
गीत म्हणाली 
गीत म्हणाली आणि नंतर 
पत्थर झाली 

सरळ भाबडी वाट अचानक 
वनांत वळली 
वनांत वळली अन नंतर 
डोहातच बुडली 

सर्वस्वाचे दान उधळण्या 
कुणि तळमळली 
तळमळली अन मिटून डोळे 
मनांत जळली 

अजून कधीतरी पत्थरांतुनी 
कण्हते गाणे 
डोहांकाठी फिरे पाखरूं 
केविलवाणे 

: एक चांदणी 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

Monday, August 28, 2017

खुणा

डोळेभेटीची ओळख 
चारचौघांत विसर 
दाट पानांत लपव 
भित्री श्रावणाची सर 

फुलपंखी कुजबुज 
ठेव ओठात मिटून 
वर निबर शब्दांची 
रास ठेवावी रचून 

पापण्यांची गूढ भाषा 
अर्थ तुला मला ठावें 
वाट चुकल्यावरच 
पाखरांनी गाणे गावे 

पळसाच्या फुलांकडे 
पहा हळूच चोरून 
लपविल्या आशयाच्या 
खुणा तिथेच अजून 

: खुणा 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

बाहेर

बाहेर 
चांदण्यांच्या बावऱ्या फांदीवर 
धुक्याचे दोन पक्षी 
जुळ्या कळ्यांसारखे 
उमलले आहेत ..... 

बाहेर 
दूरच्या चांदणीच्या 
बावलेल्या पापणीवरून 
वाऱ्याचे  दवप्रसन्न ओठ 
फिरत आहेत ..... 

बाहेर 
गुलमोहराच्या झाडावरचे 
पिंजरपक्षी 
अर्धमिटल्या लाल चोचींत 
चांदण्यांचे निळे - पांढुरके थेंब 
धरून बसले आहेत ..... 

बाहेर 
विरघलेल्या सावल्यांचा 
पाखरांच्या डोळ्यासारखा 
नितळ काळा प्रवाह 
वाहतो आहे ..... 

"आहे का ?"
"..... होय ....."
"..... मग जवळ ये ...... सगळे विसरून ...."

: बाहेर 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

Sunday, August 27, 2017

कवडसे


कधी कधी येतो अंधाराला 
नाजूक वास तुझ्या केसांचा 
स्पर्श पापण्यांवरती झुलतो 
धुक्यात बुडलेल्या श्वासांचा 

मिटलेल्या डोळ्यांतून हलती 
हे भासांचे असे कवडसे 
अन विस्कटलेल्या कळकांमधुनी 
रात्रीचे गोठती उसासे 

: कवडसे 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

अर्धी रात्र

अर्धी रात्र 
शब्दातीतच असण्याची 
अर्धी रात्र 
शब्दांना अडखळण्याची 

अर्धी रात्र 
सदाफुलीच्या 
चांदणीवेड्या गाण्याची 
अर्धी रात्र 
डोळ्यांमधल्या 
अबोल गहिऱ्या पाण्याची 

अर्धी रात्र 
उतट कुसूंबी मोहाची 
अर्धी रात्र 
काळोखाच्या डोहाची 

अर्धी रात्र 
कळूनही नच  कळण्याची 
अर्धी रात्र 
डोळे मिटून जळण्याची 

: अर्धी रात्र 
: उत्सव 
: मंगेश पाडगांवकर 

पिसे

बोरी बाभळीला । नसे आठवण ।
फुलांची ठेवण । फुलांमागे ।।

करवंदी जाळी । वेळू  फुलारला ।
मृत्यू सामावला । ओंजळीत ।।

तुझ्या गावामध्ये । जळता डोंगर ।
पाण्याचा सांभाळ । कोण करी ?।।

स्मरतांना असें । साजनाचे पिसे ।
मला कोणी नसे । मागे पुढे ।।

: पिसे 
: सांजभयाच्या साजणी 
: ग्रेस 

Friday, August 4, 2017

बीते रिश्ते तलाश करती है

बीते रिश्ते तलाश करती है
ख़ुशबू ग़ुंचे तलाश करती है

जब गुज़रती है उस गली से सबा
ख़त के पुर्ज़े तलाश करती है

अपने माज़ी की जुस्तुजू में बहार
पीले पत्ते तलाश करती है

एक उम्मीद बार बार कर
अपने टुकड़े तलाश करती है

बूढ़ी पगडंडी शहर तक कर
अपने बेटे तलाश करती है

Tuesday, August 1, 2017

जन्म नि मृत्यू


सुकतात कुणाचे 
     ओठ दुधाचे 
दुखतात कुणाच्या 
     काठ मनाचे 

उरतेही कुणाच्या 
     काजळ डोळा 
मिटतात सुखाने 
     फसवून काळा 

उरतात हिवाळी 
     हेतू कुणाचे 
सरणात पुन्हा ये 
     भूत कुणाचे 

हसतात कुणाचे 
     वाटेवरले 
रडतात कडूसे 
     खाटेवरले 

फसतात कुणाचे 
     जन्म नि मृत्यू 
पडसाद होतें 
     केवळ आयु 

: जन्म नि मृत्यू 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

अहेवपण

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी 
एखाद्या प्राणाची दिवेलागण 

सरत्या नभाच्या सूर्यास्तछाया 
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण 

एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल 
विलग पंखाचे मिटत मन 

एखाद्या प्राणाचे विजनपण 
एखाद्या फुलांचे फेडीत ऋण 

गीतांत  न्हालेल्या निर्मळ ओठा 
प्राजक्तचुंबन एखादा प्राण 

तुडुंब जन्मांचे सावळेपण
एखाद्या प्राणाची मल्हारधून 

एखाद्या प्राणाचे सनईसुर 
एखाद्या मनाचे कोवळे ऊन 

निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा 
एखाद्या सरणा अहेवपण 

: अहेवपण 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

पूजा

थोडे तरी रक्त वाहो शुष्क हृदयीचे 
देठ उजळण्या मंद बकुळफुलांचे 

पाणियाची मुळी  व्हावी निळी कमळंण 
तैसा शब्द व्हावा तृषातृप्त द्रोण 

दोन हातांतील  पूजा येथेच राहून 
दोन डोळ्यांच्या  काठानें आले गेले जन्म 

व्हावी हातांची परडी खुडू यावे डोळे 
अश्रूस्नात मन व्हावे मोगरीचे कळे 

काही नाही तेथोनिया गंध कळीस्तव 
वाहतांना यावा जीवा पांघरू विस्तव 

: पूजा 
: दिवेलागण 
: आरती प्रभू