Friday, June 23, 2017

नभात उरलें

जलराशीची ओढ अनावर 
हवीच जर का तुला कळाया , 
हवेच व्हाया तुजला वाळू 
कणाकणाने ... तसें झिजाया . 

- पुण्य न तितुकें असतें गाठीं 
शापायला तुला तसे पण ; 
ओघ गोठला जलाशयांतील 
नभांत उरलें फक्त निळेपण . 

: नभात उरलें 
: मृगजळ 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment