Friday, June 23, 2017

वादळ-वेल

वादळाची लाट अशी 
मुक्त केशकलापाची, 
अरण्ये नी 
मध्यरात्र 
यांच्या स्वैर मिलाफाची ,
पर्वतांच्या सागरांच्या 
स्वप्नातील आलापांची 
आदळता 
वेलावर 
पान फूल खाली पडे ,
आकाशाच्या सारांशाची 
अनावृत भेट घडे 

: वादळ-वेल 
: वादळवेल 
: कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment