Thursday, June 15, 2017

गंधाली

रंग सावळा सतेज 
जसा पानझडीचा गंध, 
शान यौवनाची आहे 
जसा केवडा सुगंध 

हिना बागडावा तसा 
भोळाभाबडा स्वभाव 
चंदनाच्या सुवासाचा 
सोशीकसा सेवाभाव 

परिमळांचा गुलाब 
तसे बोलणे मंजुळ 
अशी चतुर लाघवी 
जसा मोगरा सोज्ज्वळ 

अशी लाडकी गंधाली 
माऊलीच्या सावलीत 
कुठे तिष्ठताहे हिचा 
वनमाळी भाग्यवंत 

: गंधाली 
: बाहुल्या 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment