Thursday, June 15, 2017

तोच रस्ता

तोच रस्ता , तें  आंगण 
तेच मेंदीचे कुंपण 
त्याच झुलणाऱ्या वेली ,
तेच उत्सुक दालन ,

त्याच रेखीव पायऱ्या 
पुढे सारेच अनोखे 
उभे निरोपाचे शिल्प 
श्वासाशब्दानें परके 

एका घोटात गिळून 
पाय रस्त्यावरी यावे 
आणि उरल्या रस्त्याचे 
रस्तेपणचं संपावे 

: तोच रस्ता 
: बाहुल्या 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment