Wednesday, April 19, 2017

पान पडतांच

चंद्र आला डोईवर 
गाव आला हाकेवर 
असेल ग झोपलेला 
बाळ तुझ्या मांडीवर 

कशी सरळ न वाट 
पुढे नदीचे वळण 
पांच वातीतील एक 
तेवतसेल अजून 

झाडांझाडांतील वारा 
सळसळे जरा जरा 
लगबग येशील ग 
पान पडतांच दारा 

: पान पडतांच 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment