Friday, April 21, 2017

कवी कोण ?

देवलसी  जीव सदाचा उदासी 
   फुकाच्या सुखासी पार नसे 
भावनेला फुल भक्तीचा गोसावी 
  दिसे तसे गोवी काव्याभासे 
लोण्याहून मऊ मायेचे अंतर 
   दुर्बळा अंतर देत नसे 
देवाचे संदेश उचलुनी दावी 
   विश्वासी सुखवी आत्मज्ञानीं 
मनाने बालक बुद्धीने जो वृद्ध 
   तोडितो संबंध जगे जरी 
सोंदर्याचा भोगी जीवनी विरागी 
   निद्रेतही जागी जगासाठी 
कर्तव्याची चाड कुडीच्या परीस 
   दगडा परीस  करू शके 
मतीने कृतीने  युक्तीने निर्मळ 
   तेजाने उजळ करी जना 
हाच खरा कवी प्रीत पाझरवी 
   तेजे दीपें रवी ईश्वर हां 

: कवी कोण ?
: चांदणवेल 
: बाळकृष्ण भगवंत बोरकर 

No comments:

Post a Comment