Wednesday, April 19, 2017

पावरी

फिके फिके रंग व्हावे गर्द गर्द निळे 
डोळे डोळ्यांत  तसेच झाकून राहिले 

तुझ्या माझ्या अस्तित्वाची स्तब्ध रानजाळी 
एकदाच उजळेल मरणाच्या वेळी 

रंग रंगांत  तोंवरी गर्दसे वाहूं दे 
प्राण होऊन पावरी वाजत राहूं दे 

: पावरी 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment