Wednesday, April 19, 2017

देहत्व

बुडे दीस ; मागें 
काळानिळा अस्त :
वैराण डोळ्यांत समंधाची गस्त 

एकाच प्राणाचे
कित्येक किनारे 
घुंडून पडले बरगड्यात  वारें 

दाटोनियां येते 
बारापुढे रात ;
तोवरी तेवेना देहत्व प्रेतांत  

: देहत्व 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment