Thursday, March 2, 2017

असेच होते म्हणायचे तर

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?
असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसलिस का ?
स्वप्नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर रुसलिस का ?
असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का ?
भरात येऊन भलत्यासलत्या करांत माझ्या शिरलिस का ?
असेच होते म्हणायचे तर अशी जिवाला डसलिस का ?
केस मोकळे ओले घेऊन वणव्यामध्ये घुसलिस का

विंदा करंदीकर

No comments:

Post a Comment