Wednesday, March 29, 2017

सावल्यांचे नृत्य

सावल्यांचे नृत्य माझ्या चांदण्याच्या अंगणात 
घननीळ वेदनांचे लास्य तुझ्या गायनात !

अबोलीचा गोड माझा दिसायला साधाभोळा 
पोटी परी गांठ त्याच्या ठायी माझ्या काळजाला 

सुरंगीच्या सुगंधाने डंख विसरला नाग 
रात्र ओथंबली तरी जाईना का तुझा राग ?

जांभ रंगा आला दारी तळी गुलालाची रास 
माघ मोहरला अंगी जरा बिलगूनी हांस 

: सावल्यांचे नृत्य 
: चांदणवेल 
: बा भ बोरकर  

No comments:

Post a Comment