Wednesday, March 29, 2017

दैव

ताजी तहान ताजी भूक 
सहजप्राप्त फक्त सुख 
नांगरलेले शेत तसेंच 
भरून गेला ढग पुढेच 

: दैव 
: दिवेलागण 
: आरती प्रभु 

चंद्र -व्यथा

साचल्या अंतरी मध्यरात्री असा 
दर्पणामधून पडे कवडसा 
पडे कवडसा हले मनमासा 
मावळे दर्पणी चंद्र फिकटसा 

: चंद्र -व्यथा 
: दिवेलागण 
: आरती प्रभु 

अर्थ

हा भार हा शिणगार 
हा उत्सव ही वाटचाल 
या सगळ्यावर पसरलेले 
अफवेसारखे आभाळ 

याचा अर्थ सांगण्यासाठी 
कुठल्या तरी झाडावर 
वसलेला असेल का 
एखादा पक्षी उत्सुक-पर 

: अर्थ 
: दिवेलागण 
: आरती प्रभु 

पाडवा

जाता जाता गेला । फाल्गुन सरून 
चैत्रातले ऊन । उतरले 

पाण्यापास रंग । नुरले वेगळे 
फक्त ते  हासले  । तान्हयापरी 

वाटे वाटे जीवा । दृष्टीचा पाडवा 
आज करू यावा । आसमंती 

: पाडवा 
: दिवेलागण 
: आरती प्रभु 

सावल्यांचे नृत्य

सावल्यांचे नृत्य माझ्या चांदण्याच्या अंगणात 
घननीळ वेदनांचे लास्य तुझ्या गायनात !

अबोलीचा गोड माझा दिसायला साधाभोळा 
पोटी परी गांठ त्याच्या ठायी माझ्या काळजाला 

सुरंगीच्या सुगंधाने डंख विसरला नाग 
रात्र ओथंबली तरी जाईना का तुझा राग ?

जांभ रंगा आला दारी तळी गुलालाची रास 
माघ मोहरला अंगी जरा बिलगूनी हांस 

: सावल्यांचे नृत्य 
: चांदणवेल 
: बा भ बोरकर  

Saturday, March 25, 2017

कडेलोट

वेडा रानवाटांसंगे गात भटकता 
वळता वळता आलों असा कडेलोटा 

दिवेलागणीसारखे मागे सुखदुःख 
पुढे पोरके आकाश ; मध्ये उंच टोक 

मिटू तरी कसे ... कसे खोलू रुखे-ओले 
असे दोन्ही डोळे ... कुठे बोलू मनातले ?

: कडेलोट 
: दिवेलागण 
: आरती प्रभु 

Wednesday, March 22, 2017

पाषाण

कडेलोटावर एक 
विस्मृत पाषाण 
फेसाळून भिडे वर 
समुद्रउधाण 

असावासा वाटे त्यांत 
देऊळगाभारा 
रात्रंदिन गर्जे असा 
समुद्रनगारा 

: पाषाण 
: दिवेलागण 
: आरती प्रभु 

Sunday, March 12, 2017

मन

एका घरातले दिवे 
एकाएकी मालवले 
गच्चं पंख पानांतले 
पुन्हा हलून झाकले 

अशा हळुवार वेळे 
पुन्हा झाकलेत डोळे 
कुठे हलत्या फांदीला 
निःचलच बिलगले 

मालवत्या घरालाही 
असतात चारदोन 
दारे,आणि माणसाला 
असे तेवणारे मन 

: मन 
: दिवेलागण 
: आरती प्रभु 

अर्थ

पांघरुणाला अर्थच नव्हता कसला 
झाडांना पण शिशिर नव्हता डसला 
झड़ू लागली पाने पिकून जेव्हा 
गंध कळीला फक्त जरासा शिवला 

: अर्थ 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

Saturday, March 4, 2017

ख़ुदा

ख़ुदा हमको ऐसी ख़ुदाई न दे
कि अपने सिवा कुछ दिखाई न दे
ख़तावार समझेगी दुनिया तुझे
अब इतनी भी ज़्यादा सफ़ाई न दे
हँसो आज इतना कि इस शोर में
सदा सिसकियों की सुनाई न दे
अभी तो बदन में लहू है बहुत
कलम छीन ले रोशनाई न दे
मुझे अपनी चादर से यूँ ढाँप लो
ज़मीं आसमाँ कुछ दिखाई न दे
ग़ुलामी को बरकत समझने लगें
असीरों को ऐसी रिहाई न दे
मुझे ऐसी जन्नत नहीं चाहिए
जहाँ से मदीना दिखाई न दे
मैं अश्कों से नाम-ए-मुहम्मद लिखूँ
क़लम छीन ले रोशनाई न दे
ख़ुदा ऐसे इरफ़ान का नाम है
रहे सामने और दिखाई न दे

बेबसी सिसकीयां हीचकीयां तडप 
खुदा मौत दे दे जुदाई न दे 

बशीर बद्रThursday, March 2, 2017

उदासबोध

आज हयात असते रामदास
तर भोवती बघून हरामदास,
अंतरी झाले असते उदास
लागोन चिंता.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे,
त्यांचेवरी संरक्षणछत्र आहे
पोलीस, पुढा-यांचे.
या सत्याचा लागता शोध,
कुठून सुचता दासबोध ?
लिहिला असता उदासबोध
श्रीसमर्थांनी.
भ्रष्टाचारे पोखरला देश,
दीन जनांसि अपार क्लेश,
दुर्जनां यश, सज्जनां अपेश
सर्वत्र दिसे.
नीतीचा डोळा काणा,
प्रत्येक माणूस दीनवाणा,
सर्व फोलकटे, नाही दाणा,
पीक ऐसे.
देवतांसि उचलून धरती,
वेडेविद्रे नाच करती,
भसाड, ओसाड आरती
झोकून दारु.
कबीर सांगे अल्लाची महती,
मुंगीच्या पायी घुंगुर वाजती
तरी ते अल्लासि ऐकू येती
ऐसे म्हणे.
येथे अल्लासि बहिरा मानती,
ठणाणा ध्वनिक्षेपक आणती
त्यातून कर्कश बांग हाणती
अल्लासाठी.
कंडम बर्गड्यांच्या जनतेवरी
बिल्डर, स्मग्लर, गुंड राज्य करी,
प्रत्येक नेता खिसे भरी
हाती धरोन तयांसि.
दुष्काळ खणी, भुई फाटे,
शोष पडून विहीर आटे,
काळा कडू गहिवर दाटे
गळ्यात भविष्याच्या.
सत्य सामोरे पाहण्यासाठी
त्राण असावे लागे गाठी,
भेकड पळपुट्याचे पाठी
हिजडा लागे.
ग्रंथा नाम उदासबोध,
कविजनतेचा संवाद,
काळा कडू आतला विषाद
हलका केला.       
इति श्रीउदासबोधे कविजनतासंवादे उदासबोधनाम समास

: मंगेश पाडगावकर

असेच होते म्हणायचे तर

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?
असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसलिस का ?
स्वप्नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर रुसलिस का ?
असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का ?
भरात येऊन भलत्यासलत्या करांत माझ्या शिरलिस का ?
असेच होते म्हणायचे तर अशी जिवाला डसलिस का ?
केस मोकळे ओले घेऊन वणव्यामध्ये घुसलिस का

विंदा करंदीकर

फुंकर

बसा म्हणालीस - मी बसलो
हसलीस म्हणून हसलो
बस्सं.. इतकेच... बाकी मन नव्हते थाऱ्यावर
दारावरचा पडदा दडपित तू लगबग निघून गेलीस माजघरात
माझ्यासोबत ठेवून तुझ्या शुष्क संसाराच्या निशाण्या ..
या जाळीच्या पडद्याआड कशाला कोरले आहेस
हे हृदय उलटे उत्तान ?
काचेच्या कपाटात कशाला ठेवल्या आहेस भूश्शाच्या राघुमैना ?
उडताहेत लाकडी फळांवर कचकड्यांची फुलपाखरे
भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्रे हारीने
काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा
त्यातला एक जरी टाका चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो
तू विचारलेस -काय घेणार ?
काय पण साधा प्रश्न - काय घेणार?
देणार आहेस ते सारे पूर्वीचे ?
मला हवे आहेत चिंचेचे आकडे - ते अधाशी ओठ, ती कुजबूज त्या शपथा
दे झालं कसलंही साखरपाणी
तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे
तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर ओसंडते आहे
बळकट बाहू, रुंद खांदे,डोळ्यांत कर्तेपणाची चमक छान आहे
राग येतो तो तुझा
या चित्रात तू अशी दिसतेस की जसे काही कधी झालेच नाही
मी तुला बोलणार होतो छद्मीपणाने निदान एक वाक्य -एक जहरी बाण
ते मला जमले नाही
आणि तू तर नुसती हसत होतीस
आता एकच सांग --
उंब~यावर तुझ्या डोळ्यांत पाणी आले
इतकी का तुला सुपारी लागली ?
पण ... नकोच सांगूस
तेवढीच माझ्या मनावर एक...फुंकर
: वसंत बापट


डाळिंबीची डहाळी अशी

डाळिंबीची डहाळी अशी
नको वा-यासवे झुलू,
सदाफुलीच्या थाटात
नको सांजवेळी फुलू
बोलताना लाटेपरी
नको मोतीयाने फुटू
सावल्यांच्या पावलांनी
नको चांदण्यात भेटू
नको घुसळू पाण्यात
खडीसाखरेचे पाय
नको गोठवू ओठात
दाट अमृताची साय
:  बा. . बोरकर