Tuesday, February 21, 2017

घनांनी वाकलेला मी

घनांनी वाकलेला मी
फुलांनी झाकलेला मी;
जराशा मंद स्पर्शाने
मनाला कंप का सुटतो?
कधीचे रूप भिजलेले
तमातील गार वनराई;
नदीच्या शुभ्र धारांनी
नदीचा ऊर का फुटतो?
मनातून वाहणारी ही
युगांची आंधळी गाणी;
जरासे खोल बघतांना
गळ्यातून शब्द का फुटतो?
-ग्रेस

No comments:

Post a Comment