Tuesday, February 21, 2017

संध्याकाळ

कधी एकांत रेखावा
कधी लोकांताची रीत
उभ्या जन्माला न मिळे
तुझ्या प्रारब्धाचे गीत
तूच डोंगर पेरावे
तूच नाचवावी झाडे
असा आकांताचा जन्म
तूच द्यावा चंद्राकडे...
मला भावते साजणी
फक्त अशी संध्याकाळ
बाळमुठीला लागतो
जिथे आसवांचा तळ.
-ग्रेस

No comments:

Post a Comment