Thursday, February 23, 2017

भगवंत

ही चंद्र-उदयिनी वेळा
घननीळ काठ मेघांचे
भरतीच्या क्षितिजावरुनी
घर दूर जसे सजणाचे....
तू उभी अधोमुख येथे
निद्रेचा उधळून जोग
गर्भात धरित्रिच्याही
ये जशी फुलांना जाग....
बहरात दुःख अनवाणी
की पैलथडीची रात...
माझाच स्पर्श सर्पाचा
अमृतमय माझे हात....
अंधार कडे घेऊन
हे कोण रडाया आले?
दृष्टीत अरण्यामधले
मातीचे चंदन ओले...
तरि तुझ्या कुशीचा रंग
शरिरावर माझ्या उमटे
की चिंब अभंगामधला
भगवंत स्मृतीवर दाटे....

No comments:

Post a Comment